महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार गुंड (माध्यमिक) यांची निवड , शिक्षक आमदार ज . मो.अभ्यंकर यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र...


विजयकुमार गुंड यांची शिक्षक सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

करमाळा सूर्यमुद्रा न्यूज (  27) : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सोलापूर माध्यमिक जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार गुंड तर प्राथमिक जिल्हाध्यक्षपदी देवदत्त मेटकरी यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे शिक्षक सेनेचे शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्षपदी गोरख ढेरे, जिल्हा सरचिटणीसपदी सचिन गाडेकर, प्राथमिक सरचिटणीसपदी नितीन रुपनर, प्राथमिक जिल्हा कार्याध्यक्ष गायकवाड सर, करमाळा तालुकाध्यक्षपदी इरफान काझी आणि माढा तालुकाध्यक्षपदी उल्हास उबाळे यांचीही निवड जाहीर करण्यात आली.

नियुक्तीप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था चालक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक सेना कटिबद्ध असून संघटना तळागाळातील घटकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात संघटितपणे संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नूतन जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी नियुक्तीबद्दल शिक्षक सेनेच्या राज्य नेतृत्वाचे आभार मानून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर चालत संघटना विस्ताराला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक सेना प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे, राज्य सरचिटणीस रमेश चौगुले, प्रकाश शेळके, राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, राज्य विधी विभाग अध्यक्ष मच्छिंद्र खरात, मुंबई विभाग सरचिटणीस मुरलीधर मोरे, ज्युनियर कॉलेज युनिट मुंबई विभाग सरचिटणीस मंगेश पाटील, कोषाध्यक्ष प्रभाकर भोईटे, मुंबई उपाध्यक्ष विजय गवांदे, अशोक पाटील, दक्षिण मुंबई अध्यक्ष केरबा सरक, रात्रशाळा युनिट अध्यक्ष ठाकरे, तसेच सर्जेराव पाटील, हणमंत पाटील, प्रदीपकुमार खाडे, राजाराम शिरमवाड, सुरेंद्र यादव, दिनेश सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रातील हक्क, न्याय आणि सन्मानासाठी शिक्षक सेनेची ताकद अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog

मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केली पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर