आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

करमाळा- (सूर्यमुद्रा न्यूज )
शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना घेऊन येत परंतु त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाहीत ,त्या योजना त्यांच्यापर्यंत  पोहचवून  त्यांच्याशी संवाद साधून इतरही त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना तत्पर राहील असे मत तालुकाध्यक्ष दिनेश मुथा यांनी व्यक्त केले ते करमाळा येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना ह्युमन राईट संघटनेच्या बैठकीत बोलत होते
संघटनेची कार्यकारणी विस्तार, उपक्रम या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना श्री मुथा म्हणाले की संघटनेचे कार्य राज्यात आहेत तसेच इतर राज्यामध्येही संघटना कार्यरत आहे
 संघटनेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना न्याय मिळत आहे आणि करमाळा तालुक्यामध्ये ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचा कृतिशील कार्यक्रम राहील 
नागरिकांची खूप छोटी छोटी कामे असतात परंतु समन्वयाचा अभाव असल्यामुळे कामे वेळेत होत नाहीत, संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याशिवाय राहणार नाहीत
आंतरराष्ट्रीय मानवाधिक्कार संघटना संस्थापक अध्यक्ष अविनाश सकुंडे, राज्य जनसंपर्क अधिकारी संतोष माने, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अफसर भाई चांद कुरेशी ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर,, प्रदेश उपाध्यक्ष सुनील पवार ,युवा राज्य अध्यक्ष ओंकार माने ,युवा राज्य उपाध्यक्ष किशोर पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची वाटचाल केली जाणार असून संघटनेत सामील होण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
यावेळी बैठकीस सुहास ओहोळ, जयंत दळवी, वैभव दोशी, शिवनाथ घोलप, कटारिया ,नरेंद्रसिंह ठाकुर राहुल भालेराव योगेश कोळेकर 
आदी जण उपस्थित होते 
लवकरच संघटनेचा मेळावा होणार असल्याची माहिती ही संयोजकांनी दिली 

Popular posts from this blog

मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केली पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया