मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केली पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

करमाळा (18) सूर्यमुद्रा न्यूज)

मा . आ . जयवंतराव जगताप यांनी पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाची स्वतः पाहणी करून काम पावसाळ्यापूर्वी व गुणवत्तापूर्ण करण्याबाबत ठेकेदाराला दिल्या सूचना 
सीना नदीवरील पहिला के .टी . म्हणजे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा  असलेल्या पोटेगाव बंधाऱ्याचे दुरुस्ती काम मागील वर्षीच उन्हाळ्यात सुरू झाले होते परंतू मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात मोठा पाऊस झाल्याने नदीला पाणी आल्याने काम करण्यास अडथळा आला होता . त्यामूळे यावर्षी एप्रिल महिन्यात हे दुरुस्ती चे काम चालु करण्यात आले आहे
 . यात दोन्ही बाजूंनी पिचींग / संरक्षक भिंती बांधून झाल्या आहेत . प्रत्यक्ष फांऊडेशन लगत लीकेज थांबावे म्हणून काँक्रीट मधील बीम भरण्याचे काम चालू आहे परंतु पोटेगाव  ,बाळेवाडी , निलज , बोरगाव भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष काम चालू असताना कामाच्या गुणवत्तेबाबत आक्षेप घेवून निकृष्ट दर्जाचे काम होत आहे याबाबत आवाज उठवला व काम बंद पाडले .
 मा . आ . जयवंतराव जगताप यांच्याकडे ग्रामस्थांनी संपर्क साधून याबाबत कळविले . त्यानंतर तात्काळ मा . आ . जयवंतराव जगताप यांनी संबंधीत ठेकेदाराला फोनवरून निकृष्ट दर्जाचे काम आजीबात चालणार नाही , कामात हयगय चालणार नाही , इस्टीमेट प्रमाणे काम झाले पाहिजे अशी तंबी दिली होती . त्यानंतर लगेच रविवारी त्यांनी ठेकेदार समक्ष प्रत्यक्ष साईट  भेट देऊन उपस्थीत नागरिकांसमोर सूचना दिल्या . व नागरिकांनाही जातीने लक्ष ठेवण्याचे आवाहन केले . यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Popular posts from this blog

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर