शासकीय औद्योगिक प्रशिक्ष्ण संस्था, करमाळा चे "मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा" नामांतर सोहळा मा.ना.मंगलप्रभात लोढा यांच्या शुभहस्ते संपन्न..
करमाळा सूर्यमुद्रा न्यूज (30)
करमाळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.) संस्थेला शासनाच्या धोरणानुसार करमाळयाचे सुपुत्र व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्व. मदनदासजी देवी यांचे नांव दिले आहे, त्या अनुषंगाने "मदनदासजी देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा, जि. सोलापूर" असे नामांतर सोहळा संस्थेत
मंगळवार दिनांक 30/06/2026 रोजी सकाळी 10.00 वा. पार पडला असून या सोहळयाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कौशल्य् रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मा. ना. श्री. मंगलप्रभात लोढा, मंत्री, व इतर सन्माननीय मान्यवर तसेच करमाळा व आसपासचे प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्यप्रणाली व्दारे मदनदासजी देवी यांच्या कार्याचा गौरव व संस्थेस देण्यात आलेल्या नावासंबंधी मनोगत व्यक्त् केले. यानंतर पुढे मा. ना. श्री. मंगलप्रभात लोढा यांनी तांत्रिक प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले, करमाळा संस्थेत नवनवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करणे, विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य् व त्याच्या महत्वाविषयी मार्गदर्शन करताना
देशाच्या प्रगतीसाठी याचे महत्व् अधोरेखित केले. यानंतर प्रमुख पाहुणे मा.श्री.सुनिलजी आंबेकर यांनी बोलताना मदनदास देवी यांच्या जीवनपटाचे वर्णन केले असून देशाच्या नवयुवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी व राष्ट्राच्या विकासासाठी एक होण्याकरिता केलेल्या कार्याचे विश्लेषण करुन मदनदासजी यांच्या कार्याचे महत्व् पटवून दिले.
या कार्यक्रमात तालुक्याचे आमदार मा. श्री. नारायण पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त् करताना तांत्रिक शिक्षणाबाबत माहिती दिली. यासोबत जिल्हा परिषद सदस्य् सौ. रश्मीदिदी बागल-कोलते, मा.आ.राम सातपुतेसाहेब आणि मा.सौ.मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा, करमाळा नगरपरिषद यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नामांतर सोहळयासाठी मा.श्री.सतिश सुर्यवंशी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मंबई, मा.श्री.चंद्रशेखर ढेकणे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पुणे, मा. श्री. जितेंद्र राठी, IMC अध्यक्ष, मा. श्री. मनोज बिडकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सोलापूर हे उपस्थित होते, या कार्यमक्रमाचे संपूर्ण नियोजन संस्थेचे प्राचार्य श्री. तिमथ्य् मिसाळ साहेब, श्री. ओंबासे साहेब, आणि श्री.जाधवसाहेब, तसेच श्री. मनोज सातव,गटनिदेशक यांनी केले असून यासाठी संस्थेचे कर्मचारी श्री. माने के.डी. श्री. वाघमारे एस.पी. श्रीम.उर्वशी ठवरे, श्री. श्रीकांत गुरव, श्री. गणेश पिसे, श्री. परदेशी ए.बी., श्री. साठे ए.पी. श्री. मणेरी जे.जी. श्री. कटटीमनी, एस.आय. श्री.पंढरीनाथ शिंदे, श्री. युवराज शिरसट व सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. बिडकर साहेब यांनी केली असून सूत्रसंचालन श्री. माधव देशपांडे यांनी केले, तर मा. सुर्यवंशी साहेब यांनी आभारप्रदर्शन केले.