*केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कृषी निर्यात व्यापार वाहतूक संबंधित पाठपुराची घेतली दखल
*केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कृषी निर्यात व्यापार वाहतूक संबंधित पाठपुराची घेतली दखल
करमाळा 24
सूर्यमुद्र न्यूज
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज येथील वाहतूक संकटामुळे निर्यातदार, शेतकरी व व्यापार क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर माढ्याचे खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी
केंद्र सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली होती
.त्यास प्रतिसाद देत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री मा. पीयूष गोयल साहेब यांनी पत्राद्वारे माहिती दिली असून
केंद्र सरकारने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत विविध मंत्रालयांच्या समन्वयातून तातडीच्या उपाययोजना सुरू केल्याचे नमूद केले आहे.
यामध्ये निर्यात व ट्रान्सशिपमेंट सुलभता, प्रभावित खेपासाठी शुल्क सवलती ,
पर्यायी मार्गाची उपलब्धता,rodtep दरवाढ, इसीजीसी मार्फत मदत मिळणे,
खराब होणाऱ्या कृषी मालासाठी विशेष उपाययोजना,
ग्रीन कॉरिडोर व समर्पित शिपिंग व्यवस्था यासारख्या महत्त्वाच्या निर्णयाचा समावेश आहे
इराण-इजरायल-अमेरिका यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून अरब देशांमध्ये निर्यात होणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळे व भाजीपाला यावरती परिणाम झाला होता त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील तसेच देशातील शेतकरी हा शेतमालाला उठाव नसल्यामुळे व शेतमालाचे दर पूर्ण कोसळल्यामुळे हवालदिल झाला होता.
शेतकऱ्यांची झालेली नुकसानकारक परिस्थिती ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे माध्यमातून केंद्रसरकार समोर सर्वात प्रथम निदर्शनास आणून दिली आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
शेतकरी, निर्यातदार आणि व्यापार क्षेत्राच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार मा.धैर्यशील मोहिते पाटील यांचे प्रयत्न निश्चितच दिलासादायक ठरत आहेत.