शिव महापुराण कथेचा आज समारोप कथा पाच वाजता सुरू होणार महाप्रसादाचे आयोजन
: करमाळा 21
सूर्यमुद्र न्यूज
शिव महापुराण कथा, आज गुरुवार 21 मे रोजी होणार समारोप ,आजची कथा सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असून कथेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य यजमान श्री श्रेणिकशेठ खाटेर यांनी दिली
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी केले.
पवित्र अधिक मासानिमित्त भव्य शिव महापुराण कथेच्या सहाव्या दिवशीच्या कथे मध्ये झी टॉकीज फेम सु श्री स्नेहगंगा माई आळंदीकर यांच्या समधुर वाणीतुन रसाळ निरूपण केले .
सहाव्या दिवशी विशेष म्हणजे दीपोत्सव सर्व महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या तसेच ब्रह्म ,विष्णू, महेश अर्थात श्री दत्तात्रेय यांचा पाळणा मोठ्या उत्साहा मध्ये पार पडला
शिव महापुराण कथेमध्ये सात संहिता विधेश्वर संहिता ,रुद्र संहिता, शतरुद्र संहिता ,कोटी रुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता, वायवीय संहिता ....
रुद्रसंहिते मधील पाच खंड , सृष्टी खंड, पार्वती खंड, कुमार खंड ,युद्ध खंड या खंडसंहितेमधून वेगवेगळे प्रसंग रोज कथेतून साकारले गेले
रोजच्या कथेमध्ये वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते
शिव महापुराण कथेमध्ये एक लाख श्लोक आहेत आज शिव महापुराण कथेचा समारोप महाआरती , निरूपण , सजीव झाकी नयनरम्य प्रसंगांमधून उत्साह पूर्ण वातावरणामध्ये आज सांगता होईल
+++++++++++++++++++++++++
* सर्व स्तरातील मान्यवरांनी लावली हजेरी
शहरांमधील व्यापारी, डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक, शिक्षक, केमिस्ट, उद्योजक, शेतकरी, वकील,राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते ,साहित्यिक, अध्यात्मिक, पत्रकार क्षेत्रातील आदीं मान्यवरांनी हजेरी लावली
********************************
++++++++++++++++++++++++
शिव दरबारात लागली
ब्रह्मानंद टाळी.........
शिव महापुराण कथेमध्ये भक्त परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन, ब्रह्मानंदा मध्ये विलीन झाला ,
मोठ्या प्रमाणात महिला फुगडी खेळून आपला आनंद , उत्साह त्यांची भक्ती यामधून दिसून येत होती
***** महाराष्ट्राच्या संस्कृतीत फुगडी हा केवळ खेळ नसून तो स्त्रीशक्तीचा आनंदाचा
आणि उत्साहाचा आविष्कार आहे
देवाच्या मंदिरात फुगडी खेळणे हे अध्यात्मिक आणि संस्कृत दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते
देवाच्या चरणी लीन होऊन, टाळ्यांच्या तालावर आणि गाण्यांच्या माध्यमातून ईश्वरचरणी आनंद व्यक्त करणे, यामुळे मन प्रसन्न होते *****
रोजच्या कथेमध्ये यजमान म्हणून लाभलेले नगरसेवक संजय सावंत, नगराध्यक्ष मोहिनी संजय सावंत , एड. संकेत खाटेर सो मोक्षदा खाटेर, कन्हैलाल देवी सो सुनीता देवी , श्रेणिक शेठ खाटेर, संगीता खाटेर, एड. विक्रांत घुमरे सौ घुमरे, संजय साळुंखे, सौ साळुंखे, डॉ. रोहन पाटील सौ पाटील , दिगंबरराव साळुंखे सौ साळुंखे, संतोष काका कुलकर्णी सौ कुलकर्णी, जगदीश शिकची सौ शिकची श्री विठ्ठलराव भनगे सौ भनगे, ,
तसेच संयोजन समितीतील नगरसेवक न. पा. गट नेते दीपक चव्हाण, दिनेश मडके सौ मडके ,रवींद्र विद्वत सो विद्वत, रंजना कुरुलकर आशाबाई देशमुखे, भावना गांधी, कविता निळ , राणी महाडिक, विना विद्वत, संगीता गुंड ,आडकर मॅडम आडकर सर, चरणसिंग परदेशी परदेशी परिवार, मनीषा कानडे ,श्रद्धा जोशी ,स्वाती मसलेकर, छाया देवकर ,वैशाली कोळी, रत्नमाला शिंदे ,कमल चव्हाण, गिरीश शहा, अग्रवाल परिवार चिवटे परिवार ,बलदोटा परिवार, दिनेश मुथा ज्योती मुथा, पितळे परिवार, मंडलेचा परिवार , रितेश कटारिया, एड. प्रियाल अग्रवाल, नारायण तात्या पवार, पाटणे परिवार, वीर परिवार, संचेती परिवार, नितेश देवी, भणगे परिवार
काळदाते परिवार आशिष बोरा, गणेश बोरा प्रदीप देवी नरेंद्रसिंह ठाकुर ,राजू फंड, फंड परिवार आदींनीही भक्ती संगीतचा आनंद लुटला...