तापमान वाढतंय, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी कोणाची..

करमाळा (19) सूर्यमुद्रा न्यूज
करमाळा शहरामध्ये सध्या या वर्षी उष्णता खुप कठीण आहे,पुढच्या काही वर्षात या हुन भयानक परिस्थिती असणार आहे.
शहराच्या चारही बाजुंनी पुर्वी खुप मोठमोठे झाडे होती, रस्त्याच्या कामात काही झाडे गेली, त्यांचे शासनाने पुर्नजिवन प्रक्रियेत संगोपण करुन ती दुसरीकडे नेउन लावायला पाहिजे होती. पण व्यावसायिक व आर्थिक काही गोष्टिंमुळे जाणुनबुजून झाड पुर्ण कापले जाते‌ शासनाने यावर विचार करायला हवा . असे परखड मत पर्यावरण प्रेमी श्री सचिन प्रदीप चव्हाण यांनी व्यक्त केले..
तसेच सध्या शहराच्या तिन्ही बाजुने असलेल्या वनखात्याच्या व शहर हद्दीतील असलेल्या झाडांची देखील तस्करी व वृक्षतोड होत आहे. यावर शासनाकडुनच योग्य भुमिका घेतली जात नाही. वनखात्याच्या विभागात तर सगळिकडे अवैध्य गोष्टिंचा वावर वाढला आहे. वनविभागाच्या जागेत वन्यप्राणी कमी व पार्टी करणारे ,जुगार खेळणारे प्राणीच जास्त प्रमाणात असतात. वन्यप्राणी दुर्मिळ म्हणण्यापेक्षा नाहीतच असे म्हणावे लागेल.
देविच्या रोडची मोठी झाडे तोडली, पण पर्यायी झाडे शासनाने लावली नाहीत व जुनी झाडे पण जगवली नाहीत. यामागे पण शोध घेतला पाहिजे.
साधी नाजुक व शोभेच्या झाडांऐवजी शासनाने वड , पिंपळ, जांभुळ, लिंब,चिंच या झाडांची जास्त लागवड केली पाहिजे.
सध्या रोडच्या कडेला किंवा वृक्षारोपण कार्यक्रमाला आयती रोपे आणुन ती उभी करुन फोटो काढुन त्यांचा कार्यक्रम साजरा केला जातो. परत ती झाडे जगलीत की नाही याकडे दुर्लक्ष होते.
याचा विचार शासनाने प्रामुख्याने करायला पाहिजे. 
येणाऱ्या जुन महिन्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम साजरा केला जातो, तो खर्या अर्थाने मानवी आरोग्यासाठी तसेच पशुपक्ष्यांचा निवारा व खाद्य यासाठी  फळांची व सावली, ऑक्सिजन देणारीच झाडे लावुन , खुप गरजेचे आहे म्हणून साजरा केला पाहिजे.
सध्या उष्णता व पाणी न मिळाल्याने बरेच पशुपक्ष्यांच्या मृत्युच्या घटना आपण व्हिडिओ व सोशल मीडिया वर पाहत आहोत. 
झाडा लावा व झाडे जगवा.
कारण उष्णतेवर एसी,कुलर हा दिर्घकाळाचा पर्याय नाही. मानवाचे आयुष्यमान घटले आहे.

Popular posts from this blog

मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केली पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर