शिव महापुराण कथा उद्या 15 मे ते 21 मे दरम्यान जयत तयारी सुरू

*करमाळा नगरी शिवमय! अधिकमासानिमित्त भव्य शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन*उद्यापासून कथा सुरू
*१५ ते २१ मे दरम्यान कथाव्यास
सुश्री स्नेहगंगाश्रीजी माई (आळंदीकर)
झी टॉकीज फेम स्यांच्या सुमधुर वाणीतून होणार शिवकथांचा ज्ञानयज्ञ- 
करमाळा  -सूर्यमुद्रा न्यूज (14)
पवित्र अधिकमासाच्या निमित्ताने करमाळा शहरात भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांची अनोखी पर्वणी अनुभवायला मिळणार असून 15 मे ते 21 मे या कालावधीत संत गजानन महाराज मंदिर, एसटी कॉलनी श्रीदेवीचा माळ रोड करमाळा
 येथे भव्य शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती संत गजानन महाराज भक्त परिवार यांच्यावतीने  श्रेणीक खाटेर व श्रीमती रंजना कुरलकर मॅडम यांनी दिली आहे
. आदरणीय  कथाव्यास
सुश्री स्नेहगंगाश्रीजी माई (आळंदीकर)
झी टॉकीज फेम यांच्या सुमधुर व प्रभावी वाणीतून होणाऱ्या या कथा सप्ताहामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून जाणार आहे.
शुक्रवार दि. १५ मे २०२६ ते गुरुवार दि. २१ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा धार्मिक ज्ञानयज्ञ पार पडणार आहे. करमाळ्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
शिवमहापुराणातील विविध प्रसंग, भगवान शंकरांचे चरित्र, भक्ती, अध्यात्म, संस्कार आणि जीवनमूल्यांचे प्रभावी निरूपण कथाव्यास
सुश्री स्नेहगंगाश्रीजी माई (आळंदीकर)
झी टॉकीज फेम आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून करणार आहेत. त्यामुळे सात दिवस चालणारा हा कथा सप्ताह भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरणार आहे. या कार्यक्रमास सर्व  भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे

Popular posts from this blog

मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केली पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर