शेलगाव वांगी येथे विविध विकास कामाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

*शेलगाव (वां)येथे विविध विकास कामांचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन 
-------------------------------------
करमाळा सूर्यमुद्रा न्यूज (30)
 मौजे शेलगाव (वां) येथे 
विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा करमाळा तालुक्याचे आमदार मा. श्री.नारायण आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडला 
उद्घाटन प्रसंगी श्री पाटील म्हणाले की शेलगाव मधील मूलभूत जे प्रश्न आहे त्यासाठी निधी उपलब्ध केला आहे
 रस्ते ड्रेनेज ,विज ,पेवर ब्लॉक आधी कामासाठी निधी दिलेला
 असून पुढील काळामध्ये ही ज्या भागातील वस्तीवर गावामध्ये  अत्यावश्यक बाबी आहेत त्यासाठी  निधी उपलब्ध केला जाईल 
नियमित पणे शेलगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचा समन्वय असतोच असेही म्हणाले..
यावेळी नवनाथ केकान ,वसंत केकान यांनी आपली विचार व्यक्त केले प्रास्ताविक महेंद्र लोंढे यांनी केले
शेलगाव मधील विकास कामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला यामध्ये
 जायभाय - ठोंबरे वस्ती - भगीरथ लाईट - २१. ६० लक्ष, ठोंबरे वस्ती बेरे सातव वस्ती  खडीकरण 15 लक्ष ,पितांबर केंदळे ते मरीआई मंदिर सिमेंट रस्ता दहा लक्ष, पोलीस पाटील ते मारुती गायकवाड आरसीसी गटार 2 लक्ष 
तुळजाभवानी मंदिर पेव्हर ब्लॉक 1.60 लक्ष 50 लक्ष 20 हजार या कामाचा 
विकास निधी देण्यात आलेला आहे
याप्रसंगी आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गोडसे, वांगी नं २ चे सरपंच गणेश जाधव, उपसरपंच बशीर पटेल त्याचबरोबर शेलगाव (वां) चे सरपंच अमर ठोंबरे, उपसरपंच दौलत पवार, 
ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवळ, दत्तात्रय केकान, वसंत केकान, भारत पोटे, भगवान पोळ, विठ्ठल कोंडलकर, धनंजय काटे, अमित केकान, समाधान जाधव सोसायटीचे चेअरमन रघुनाथ केकान,  व्हाईस चेअरमन ब्रह्मदेव जाधव, शा. व्य. समितीचे अध्यक्ष सतीश कोंडलकर सर, मा. जि. प. सदस्य चंद्रप्रकाश दराडे गुरुजी, माजी सरपंच नवनाथ आबा केकान, ठोकळ सर,
आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धनंजय खाडे, माजी सरपंच बाळासाहेब बेरे, महादेव पवार, किरण साळुंखे, हभप गोरख खाडे, हभप, हभप नवनाथ खाडे, हभप नागनाथ केकान, चंद्रकांत केकान, युवराज टकले, भारत खताळ, सोमनाथ केकान, शामराव बेरे, हरी पाटील, विठ्ठल केकान, अजित केकान, संतोष केकान, नागेश केकान इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

मा.आ.जयवंतराव जगताप यांनी केली पोटेगाव बंधाऱ्याची पाहणी

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी अँड शिंदे, डॉ दोशी , सौ झोळ. , सौ मुथा ,सौ . शिंदे यांच्या प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर